महाराष्ट्र केसरी : सोलापूरला २ तर उस्मानाबादला १ सुवर्णपदक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची शनिवारच्या सकाळच्या सत्रात सुरुवात ५७ व ७९ किलो वजनी गटातील गादी विभागातील अंतिम फेरीने झाली. म्हाळूंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे (५७ किलो) याने व सोलापूरच्या रामचंद्र कांबळे (७९किलो) यांनी सुवर्ण पदक पटकावले.

आज ५७ व ७९ किलो वजनी गटातील गादी विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले यात ७९ वजनी गट- गादी विभागात सोलापूरच्या रामचंद्र कांबळे याने उस्मानाबादच्या रविंद्र खैरेवर १४-३ गुणाने हरवत सुवर्ण पदक पटकावले. तसेच अहमदनगरचे केवल भिंगारे व सातार्‍याचे श्रीधर मुळीक यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

उपांत्यपूर्व फेरीत अहमदनगरच्या केवल भिंगारे याने नीलेश पवार कोल्हापूर शहर याचा १०-० ने पराभव करून कांस्य पदक पटकावले. तसेच दुसर्‍या उपांत्य पूर्व फेरीत सातार्‍याच्या श्रीधर मुळीक याने लातूरच्या विष्णु तातपुरेचा ७-२ ने पराभव करून कांस्य पदक पटकावले.

अंतिम निकाल –
७९ किलो गादी विभाग
सुवर्ण- रामचंद्र कांबळे (सोलापूर)
रौप्य – रविंद्र खैरे (उस्मानाबाद)
कांस्य- केवल भिंगारे (अहमदनगर)
कांस्य – श्रीधर मुळीक (सातारा)

५७ किलो वजनी गट गादी विभाग
सुवर्ण – ज्योतिबा अटकळे (सोलापूर)
रौप्य- रमेश इंगवले (कोल्हापूर)
कांस्य – आतिष तोडकर (बीड)
कांस्य – संकेत ठाकुर (पुणे शहर)

यावेळी अंतिम ५७ किलो वजनी गटात गादी विभागात सोलापूरच्या तुफानी मल्ल ज्योतिबा अटकळे याने कोल्हापूरच्या रमेश इंगवले वर चीतपट विजय मिळविला. उपांत्यपूर्व फेरीत बीडच्या आतिष तोडकर याने पुण्याच्या केतन घारे याचा १०-० ने पराभव करून कांस्य पदक पटकावले. तसेच दुसर्‍या उपांत्यपूर्व फेरीत पुणे शहराच्या संकेत ठाकुर याने कोल्हापूर शहराच्या साइराम चौगुलेच १०-० ने पराभव करून कांस्य पदक पटकावले.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

Leave a Comment