सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यात सुरू असलेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या रंगतदार लढतीत गतविजेत्या दिग्गज पैलवानांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरीचा किताब कोल्हापूर विरूद्ध मुंबई लढत होणार आहे. कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे.
आज शेवटच्या दिवशी स्पर्धेतील पहिल्या सत्रात 2019 चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा धक्कादायक पराभव झाला. तर दुसऱ्या लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने बीडच्या अक्षय शिंदेला चितपट केले. पृथ्वीराजने एकेरी पटात अक्षय याच्यावर सहा विरुद्ध चार अशा गुणांच्या फरकाने विजय मिळवला.
माती विभागात अंतिम फेरीमध्ये प्रकाश बनकर कडून सिकंदर शेखचा 13 -10 असा पराभव केला. त्यामुळे आज सायंकाळी 5 वाजता कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईच्या विशाल बनकर यांच्यात लढत होणार आहे. साताऱ्यात महाराष्ट्र केसरी 2022 कोण होणार हे पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली आहे.