महाराष्ट्र केसरी स्पर्धा : दहा वर्षानंतर काकांच्या तालमीला भेटणार मानाची गदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | महाराष्ट्र केसरीचा किताब कोणाला मिळणार हे आज मंगळवारी ठरणार आहे. नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि लातूरचा शैलेश शेळके यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे. हर्षवर्धन आणि शैलेश हे दोघेही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवारांच्या तालमीतील मल्ल आहेत. त्यामुळे यंदा काकांच्या तालमीला मानाची गदा भेटणार हे निश्चित झाले आहे. तब्बल दहा वर्षानंतर काका पवार यांच्या तालमीला ही गदा मिळणार आहे. “गेली कित्येक वर्षे आमचे आमच्या तालमीचे पैलवान महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत जात होते मात्र विजयाने आजवर आम्हाला हुलकावणी दिली. यंदा मात्र महाराष्ट्र केसरी आमचाच होणार”, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक काका पवार यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कॉर्पोरेशन यांच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी ही स्पर्धा पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू आहे. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस असून आज अंतिम सामना रंगणार आहे. माती विभाग आणि गादी विभाग अशा दोन विभागांत ही स्पर्धा होत असते. या दोन विभागातील अंतिम विजेत्या स्पर्धकांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढत होते. अंतिम लढत ही गादीवर खेळली जाते.

माती विभागात शैलेश शेळके विरुद्ध ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यात झालेल्या लढतीत लातूरच्या शैलेशने बाजी मारली तर गादी विभागात हर्षवर्धन सदगीर विरुद्ध गतविजेता मल्ल अभिजित कटके यांच्यात झालेल्या लढतीत नाशिकच्या हर्षवर्धनने बाजी मारली. आज अंतिम सामना शैलेश आणि हर्षवर्धन या दोघांमध्ये रंगणार आहे.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

खेळाडू आहात…?? मग सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी सोडू नकाच.

नव्या लढ्यासाठी मी सज्ज, आता एक इंचभरही मागे हटणार नाही – आयशे घोष

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

फेसबुक वरच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी मुंबईच्या या पठ्ठ्यानं थेट पाकिस्तान गाठलं, पुढे झालं असं काही!!

मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते – देवेंद्र फडणवीस

Leave a Comment