महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात पुढील महिन्यात होणार

0
139
Kusti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | यावर्षीची 64 वी वरिष्ठ गट गादी व मातीवरील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाची लढत सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात होईल. ही स्पर्धा 4 ते 9 एप्रिलदरम्यान होणार आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक  मोहोळ येथील कुस्ती केंद्रात झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत अध्यक्षस्थानी परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते होते. या वेळी उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, गणेश कोहळे, हनुमंत गावडे, संभाजी वरुटे, दयानंद भक्त, सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे, खजिनदार सुरेश पाटील, तांत्रिक सचिव बंकट यादव, विभागीय सचिव सुनील चौधरी, वामनराव गाते, भरत मेकाले, मुरलीधर टेकुलवार, संपत साळुंखे, शिवाजी धुमाळ, सुभाष घासे, सुभाष ढोणे, विनायक गाढवे, ललित लांडगे आदी उपस्थित होते.

साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात चार ते नऊ एप्रिलदरम्यान या स्पर्धा होतील. या स्पर्धेमुळे कुस्ती शाैकिनांच्या आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. तसेच ज्युनिअर व सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धा मारुती सावजी लांडगे कुस्ती हॉल (भोसरी-पिंपरी चिंचवड) येथे ता. 18 ते 20 एप्रिलला होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here