व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मानापमानाचा वाद चव्हाट्यावर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात सुरू असलेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मानापमानाचा वाद चव्हाट्यावर आला. साहेबराब पवार कुटुंबीयांकडून घराणेशाही सुरू असून एकाधिकारशाही होत असल्याचा आरोप पैलवान श्रीरंग जाधव यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पवार कुटुंबियांच्या ताब्यात असलेली सातारा जिल्हा तालीम संघ आणि ऑलम्पिकवीर श्रीरंग अप्पा जाधव यांच्या कुटुंबियांच्यात कुस्ती आयोजनावरून वाद निर्माण झाला आहे. जाधव कुटुंबीयांनी या स्पर्धेवर बहिष्कार घातला आहे. शाहू स्टेडियम येथे लावलेल्या स्वागत कामानीवर कै. श्रीरंग अप्पा जाधव यांचे नाव देऊन त्यांचा फोटो न लावण्याने हा वाद समोर आला आहे.

साहेबराव पवार कुटुंबियांकडून एकाधिकारशाही होत असून याला राजकीय रंग आणला जात असल्याचे पै. श्रीरंग जाधव कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत आरोप करण्यात आला आहे. साहेबराव पवार हे आयत्या बिळात नागोबा असून खा. शरद पवारांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला बलभीम भोसले, नॅशनल चॅम्पियन साहेबराब जाधव, उपमहाराष्ट्र केसरी बजरंग कदम, नॅशनल चॅम्पियन वनराज श्रीरंग जाधव, पै. श्रीरंग जाधव यांचे चिरंजीव यांची उपस्थिती होती.