Maharashtra Kharif Sowing | राज्यात सध्या खरीप हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या देखील पूर्ण झालेल्या आहेत. खरीप हंगामामध्ये शेतकरी अनेक प्रकारची पिके घेतात. ज्या भागात पाऊस जास्त असतो, त्या भागात खरीप हंगामात शक्यतो भाताचेच पीक घेतले जाते. त्याचप्रमाणे पाऊस कमी असलेल्या भागांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके या हंगामात घेतली जाते. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात खरीप हंगामातील जवळपास 80.90% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.
मागील वर्षी पेक्षा यावर्षी खरीप हंगामातील (Maharashtra Kharif Sowing) पेरण्याचे प्रमाण जास्त आहे. कारण मागील वर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी होते. परंतु अचानकच अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने, खरीप हंगामातील पेरण्या शेतकऱ्यांनी पूर्ण केलेले आहेत.
सोयाबीनची 15 टक्के पेरणी पूर्ण
खरीप हंगामातील सोयाबीन हे एक प्रमुख पीक आहे. सोयाबीनची लागवड आणि शेतकरी करतात. परंतु मागील वर्षी सोयाबीनची पेरणी खूप कमी प्रमाणात झाली होती. परंतु यावर्षी तब्बल 115 टक्के पेरणी झालेली आहे. 47 लाख 70 हजार एकोणपन्नास हेक्टरवर सोयाबीनची ही पेरणी झालेली आहे.
ज्वारीची 31.2 % पेरणी पूर्ण | Maharashtra Kharif Sowing
ज्वारी देखील खरीप हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. यावर्षी खरीप हंगामात ज्वारीची जवळपास 31.2% पेरणी झालेली आहे. ही पेरणी जवळपास 90 हजार 188 हेक्टरवर झालेली आहे. कोल्हापूर नाशिक विभागात ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
कापसाची पेरणी
यावर्षी खरीप हंगामात नागपूर विभागात जवळपास 96 टक्के क्षेत्रावर कापूस लागला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि पुणे या विभागात 13 ते 20% एवढी कापसाची पेरणी झालेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी एकूण 8 लाख 91 हजार 456 हेक्टरवर यावर्षी कापसाची पेरणी केलेली आहे.
यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत खरीप हंगामात चांगल्या प्रकारे पेरणी झालेली आहे. कोकणात खरीप हंगामा जवळपास 34% पेरणी झालेली आहे. नाशिकमध्ये 84.14 टक्के पेरणी झालेली आहे. पुण्यामध्ये 109.41% पेरणी झालेली आहे. कोल्हापूरमध्ये 103.4% पेरणी झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये 93.50% खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झालेली आहे. लातूरमध्ये 94.38% एवढी पेरणी पूर्ण झालेली आहे. अमरावतीमध्ये 91.8% भरणे झालेली आहे तर नागपूरमध्ये 57.70 टक्के पेरणी झालेली आहे.