मागच्या निवडणुकीत कुणाचा कडेलोट झाला हे महाराष्ट्राला माहिती : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा | ते कुणाचा कडेललोट करणार हे माहिती नाही. विधानसभेच्या निवडणुकीत माझा कडेललोट करायचा असता तर मतदारांनीच केलाच असता. त्या निवडणुकीत कुणाचा कडेलोट झाला, कुणाचा पराभव झाला कोण विजयी झाले हे सातारकरांना आणि महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलण योग्य नसल्याचे म्हणत खासदार छ. उदयनराजे यांना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टोला लगावला.

खासदार उदयनराजेंनी बलात्कारी आणि राज्यकर्त्यांचा कडेलोट करणार असल्याचे विधान केले होते, यावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पुढे ते म्हणाले, महाराजांना आधी 10 वर्षाची आणि आताची राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. तरीही पुणे-सातारा हायवे सरळ होवू शकला नाही. आता महाराजांनी लक्ष घालून निदान सातारकरांसाठी टोल माफ करून घ्यावा.

सातारा नगरपालिकेचे काम स्वच्छ असत तर आरोप-प्रत्यारोप करण्याची गरज पडली नसती. जे चुकीचं घडतंय ते बोलणे गरजेचे आहे असे सांगत सातारा पालिकेच्या कारभारावर शिवेंद्रसिंहराजे यांनी टीका केली आहे..

You might also like