नागरीकांच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष…

Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी /  ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात करण्यात येणारा पाणीपुरवठा गेल्या सात दिवसांपासून बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी बोरीवासीयांना थेट प्राणहिता नदीचे पात्र गाठावे लागत आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीलाच बोरी गावात निर्माण झाल्याने जलसंकटामुळे जिल्हा प्रशासनाचे पाणीटंचाई निवारण्याचे सगळे दावे सपशेल खोटे ठरले आहे.

महाराष्ट्र जिवन प्राधिकरण ग्रामीण पाणीपुरवठा लगाम (बोरी) येथे जलशुद्धीकरण होऊन लगाम परीसरातील बोरी, शांतीग्राम, दामपूर, चुटूगुंटा, लगाम, लगामचेक, कांचनपूर, काकरगट्टा या आठ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा येत आहे मात्र पाणीपुरवठा उपविभाग गडचिरोली येथील कार्यालयने विभागीय कार्यालय आलापल्ली अंतर्गत येणाऱ्या अहेरी महावितरण कार्यालयाचे ५६००० रूपये विद्युत देयक न भरल्याने विभागीय कार्यालय आलापल्ली येथील फीरते पथक च्या चमूने दि. २९/४/२०१९ ला महाराष्ट्र जिवन प्राधिकरण ग्रामीण पाणीपुरवठा लगाम (बोरी) येथील विद्युत पुरवठा कट केल्याने याच्या फटका सर्व सामान्य नागरिकांना झेलावे लागत आहे.

शासनाकडून ग्रामीण भागातील जनतेला मुलभूत सोयी सुविधा देण्यासाठी कृती आराखडा तयार करून मोठा निधी खर्ची घातला जातो मात्र याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणा उदासीन असल्याने सर्वसामान्यांना योग्य सुविधा मिळत नसल्याचा प्रत्यत बोरी येथे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवरून येत आहे.

इतर महत्वाचे –

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटूंबियांसमवेत सुजय विखेंनी साजरा केला गुढी पाडवा

सातारच्या पोलीस हवालदाराची मुलगी झाली IAS, देशात १०८ वा क्रमांक

कडुलिंबाचे फायदे