मुंबई प्रतिनिधी | कर्णबधिर तरुण आंदोलकांना मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीचे आश्वासन देण्यात आले होते, पण सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आंदोलनकर्त्यांच्या उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी बैठक घेतली जाणार होती मात्र बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांकडून आमंत्रण न मिळाल्यामुळे कर्णबधिर तरुण आज मंत्रालयासमोर जमणार आहेत. दिव्यांग सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी चर्नी रोड ते मंत्रालय असा कर्णबधिर तरुणांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर २५ फेब्रुवारीला कर्णबधिर तरुण आंदोलनाला बसले होते. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्जे केला होता,या गोष्टीचा सर्व स्तरातून निषेध झाल्यामुळे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या लेखी आश्वासनाने आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच उर्वरित मागण्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक नंतर पूर्ण करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते.
आंदोलनातील कर्णबधिर तरुणांवर झालेल्या हल्ल्याबाबत सखोल अहवाल पुणे पोलीस आयुक्तांना देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सुरवातीला पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते मात्र फडणवीसांच्या आदेशानंतर हे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.
इतर महत्वाचे –
हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचे पायलट निनाद शाहिद