महाराष्ट्रात 31 डिसेंबर पर्यंत लॉकडाउन वाढवला ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यातच राज्यातील कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता महाराष्ट्रात ठाकरे सरकारने 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी ठाकरे सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याची माहिती यातून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रांने राज्यांना आदेश दिला होता की कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार आहे. त्यानुसार केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.

दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचं समोर आलं. खरंतर, मिशन बिगेनच्या अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. परंतु त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढला. यामुळे संसर्गाने पुन्हा फैलाव सुरू केला आहे. यामुळे 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी कठोर नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे-

  • सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक

  • सामाजिक अंतर राखणं गरजेचं

  • सतत हात धुणे आवश्यक

  • चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी

  • जलतरण तलावात एकावेळी एकाच खेळाडूला परवानगी

  • धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात 200 जणांना परवानगी

  • बंद मोठ्या सभागृहात 100 जणांना परवानगी

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment