तुम्हाला कोणी जातीवरून टार्गेट केले ; अजित पवारांचा मोदींना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी आज अकलूज येथे जाहीर सभा घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. येथे नरेंद्र मोदी यांनी स्वताचे ओबीसी कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला याचाच काही तासात अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

मोदींना कधी कोणीच जाती वरून टार्गेट केले नाही. आता बोलायला काहीच मुद्दे शिल्लक राहिले नाहीत म्हणून नरेंद्र मोदी जातीच्या मुद्द्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत असे अजित पवार म्हणले आहेत. अजित पवार  सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत आहेत. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे.

मोदी आडनाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चोर ठरवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसच्या लोकांनी सुरु केला आहे. त्यांना माझे सांगणे आहे मी खालच्या जातीचा असल्याने तुम्ही माझ्यावर टीका करा मात्र माझ्या मागास जातींच्या बांधवांवर टीका करू नका असे  नरेंद्र मोदी अकलूज येथील सभेत म्हणाले होते.

Leave a Comment