राहुल गांधींच्या संपर्कात आहात का? राज ठाकरे म्हणतात….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी|  महाराष्ट्र भर झंझावाती सभा घेवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप विरोधाची चांगलीच राळ उडवून दिली आहे. एका अंतरराष्ट्रीय वृत्वाहीनीला दिलेल्या मुलखतीत राज ठाकरे यांना तुम्ही राहुल गांधींच्या संपर्कात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर राज ठाकरे यांनी नाही असे उत्तर दिले.

मी राहुल गांधी यांच्या संपर्कात नाही. माझे फक्त एकच उदिष्ट आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सत्तेतून हद्द पार करणे. त्यासाठी मी राज्यभर सभा घेत आहे असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेनेवर प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले कि,  शिवसेना लाचारीकडे घरंगळत गेली आहे त्याच्यावर काय बोलायचे. शिवसेने बद्दल  असे बोलून राज ठाकरे यांनी शिवसेनेवर नबोलता बोचरी टीका केली आहे.

Leave a Comment