पुढील ५ वर्ष सरकारला काही धोका नाही- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजप राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याची प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील 5 वर्ष सरकार मजबूत आहे. २०२५ पर्यंत कोणताही धोका अजिबात नाही. १७० आमदार आघाडी सरकारच्या बाजूने आहेत. यात वाढ होऊन हा आकडा १८० पर्यंत जाऊ शकतो, असे स्पष्ट केले. विरोधकांकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न असेल तो त्यांचा हा प्रयत्न भ्रम असेल, असे राऊत म्हणालेत.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपच्या हालचालींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष ठाकरे सरकारच्या पाठीशी मजबूत उभे आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे काहीही चिंता करण्याचे कारण नाही असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे, असा टोला राऊत यांनी ट्वीटरवरुन मारला आहे. सरकार मजबूत आहे चिंता नसावी, असं ट्वीट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मातोश्रीवर चर्चा झाल्याची कबुली संजय राऊत यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment