पत्नीला कोरोनाची लागण, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख होम क्वारंटाईन

अहमदनगर । राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख-पाटील हे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाले आहे. मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनीच ही माहिती ट्विट करुन दिली आहे. गडाख यांच्या वाहन चालकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. याआधी मंत्री अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या पत्नी आणि नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांची काल करोना चाचणी करण्यात आली होती. आज त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यानंतर मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी स्वत:ला १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन झाले असून काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय तुम्हीही तुमच्या घरीच राहा. कुटुंबीयांची काळजी घ्या, असं आवाहन गडाख यांनी केलं आहे. दरम्यान, आज गडाख पाटील यांचा स्त्राव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. दुर्रानी यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.याआधी मंत्री अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”