नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – मुंबईजवळच्या नालासोपारामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये घरातील खोलीचे सिलिंग कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये जाधव पती-पत्नीसह त्यांची दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. प्रशांत जाधव व त्यांची पत्नी आकांक्षा जाधव असे जखमी झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. प्रशांत यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर परिसरातील जय कृष्णा सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावरील रुम नंबर 301 मध्ये मंगळवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या ठिकाणी सिलिंग कोसळल्यानंतर झालेल्या आरडाओरडा ऐकून शेजारच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी परिवाराला रूग्णालयात दाखल केले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नेमकं काय घडलं?
मुंबई जवळच्या नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर परिसरातील जय कृष्णा सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावरील रुम नंबर 301 मध्ये मंगळवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास एका घरात खोलीचे छत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले आहेत.
कुटुंबातील चौघे गंभीर जखमी
प्रशांत जाधव व त्यांची पत्नी आकांक्षा जाधव असे जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. यामध्ये त्यांची दोन मुलंही गंभीर आहेत. प्रशांत यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने त्यांना मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नालासोपारा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.