रसवंती यंत्रात पदर अडकून नांदेडमध्ये 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रसवंती यंत्रात पदर अडकून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत महिला नांदेडच्या कौठा भागात ऊसाचा रस काढून विक्री करते. यावेळी तिच्या साडीचा पदर रसवंती यंत्रात अडकला आणि हि दुर्दैवी घटना घडली. दुर्गा खोंड असे या अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. ती मूळ हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आसेगाव इथली रहिवाशी होती. पण घटनेच्या दिवशी रसवंती गृहात ऊसाचा रस विकून उदरनिर्वाह करण्यासाठी ती हिंगोलीहून नांदेडला आली होती. यादरम्यान रसवंती यंत्रात पदर अडकून या महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?
नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत साडीचा पदर ऊसाचा रस काढण्याच्या मशिनमध्ये अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संबंधित महिला नांदेडच्या कौठा भागात ऊसाचा रस काढून विक्री करते. यावेळी तिच्या साडीचा पदर रसवंती यंत्रात अडकून हि घटना घडली आहे.

उदरनिर्वाहासाठी हिंगोलीहून नांदेडला
दुर्गा खोंड असे या अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. ती मूळ हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आसेगाव येथील रहिवासी आहे. ती आपल्या उदरनिर्वाहासाठी हिंगोलीहून नांदेडला आली होती. ती रसवंती गृहात ऊसाचा रस विकून आपला उदरनिर्वाह करत होती. रसवंती यंत्रात पदर अडकून महिलेला प्राण गमवावे लागल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment