Maharashtra News : यापूर्वी अनेकदा आपण एखादी मौल्यवान वस्तू, गाडी किंवा महत्वाचे दस्तऐवज चोरी झाल्याच्या घटना वाचल्या किंवा ऐकलया असतील पण आपल्या महाराष्ट्रात चक्कं रस्ता चोरीला गेल्याची अजब घटना घडली आहे. आता तुम्ही सुद्धा हे वाचून नक्कीच बुचकळ्यात पडला (Maharashtra News) असाल पण ही घटना नेमकी कुठे घडली? कशी घडली आणि हे प्रकरण नेमकं काय आहे ? चला जाणून घेऊयात….
खरंतर ही घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातली आहे. एका RTI कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार इथं एक रस्ताच चक्क चोरीला गेलाय. 2022- 23 या आर्थिक वर्षात रस्ता न बनवता नगर परिषदेने कंत्राट दारासोबत संगणमत करून तब्बल आठ लाख 56 हजार रुपयांची उचल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
2022 -23 मध्ये अहमदनगर मेन रोड ते माधव बावनकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम झाल्याचा वास्तव प्रकाशात आलं. तर परत 2023 -24 या वर्षात याच रस्त्यासाठी तब्बल 53 लाख 51 हजार रुपयांचा निधी खर्च झाला असल्याचा प्रकार समोर आलाय. पण प्रत्यक्षात मात्र 2022 -23 मध्ये दगडाचा एकही खडा या रस्त्यावर टाकण्यात आलेला नसल्याचं इथल्या नागरिकांचा म्हणणं आहे. एकूणच नगरपरिषद प्रशासन आणि कंत्राटदार यांनी संगणमताने शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारलाय हे स्पष्ट झालं असून अनेकांना हे उघड झाल्यानंतर मात्र धक्का (Maharashtra News) बसला आहे.
सहा महिन्यापूर्वी या रस्त्याचा बांधकाम झालं आणि तेही अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून त्यामुळे या रस्त्याला भेगा पडल्या आहेत आणि म्हणूनच 2022- 23 मध्ये कंत्राटदारांनी रस्ता बांधला कुठे याचा शोध घेण्याची गरज आहे असा सूर इथल्या स्थानिकांमधून (Maharashtra News) उमटतो आहे.
दरम्यान हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर पवनी येथील तत्कालीन मुख्याधिकारी यांना विचारलं असता त्यांनी ‘मी सध्या उपस्थित नाही’ असे उत्तर देत घोटाळा उघड होताच ते लांब सुट्टीवर गेले. तर याची संपूर्ण माहिती बांधकाम विभागाचे अधिकारी देतील असं सांगून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यावर उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणात नगर परिषदेने रस्ताच गिळंकृत (Maharashtra News) केल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते आणि स्थानिक करत आहेत. आता या घोटाळ्यामध्ये अडकलेल्यांना शिक्षा होणार का ? याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.