पश्चिम महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा , इस्लामपूरात कोरोनाचे ५ नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता नऊ वर जाऊन पोहोचली आहे. इस्लामपूर येथील चार कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी ५ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या ४ वरून ९ झाली आहे. एकाच कुटुंबातील ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा हादरून गेला आहे. प्रशासनाने आपल्या हालचाली गतिमान केल्या असून या ९ जणांच्या संपर्कात कोण कोण आलं आहे त्याची माहिती आता घेण्यात येत आहे.

इस्लामपूर येथील एक मुस्लिम कुटुंबिय हज यात्रेसाठी गेले होते. हज यात्रेवरून १३ मार्च रोजी कुटुंबिय इस्लामपूर शहरात परतले होते. त्यावेळी त्यांना सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवल्याने त्यांनी सांगली सिव्हील येथे उपचार घेतला होता. परंतू त्यावेळी झालेंल्या तपासणीत ते कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले नव्हते. त्यामुळे ते कुटुंबिय इस्लामपूर येथे घरी आले होते. शनिवार १४ मार्च ते १८ मार्चच्या दरम्यान ते कुटुंबिय घरीच वास्तव्यास होते. त्यांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सात सात जणांना कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या सात जनांपैकी पाच जणांच्या स्वॅबचे अहवाल आज आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले. या अहवालानंतर एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या पाच व्यक्तींमध्ये दोन महिला दोन पुरुष आणि एक लहान मुलगीचा समावेश आहे.

इस्लामपुरातील या कोरोना बाधित ९ जणांवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत., या अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. या ९ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत, कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

Leave a Comment