परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
परभणीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये असलेल्या आयसीयूमध्ये, ऑक्सिजन अभावी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली असून, या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. कोरोनाच्या काळामध्ये इतर रुग्णांकडे, रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे, या घटनेमुळे सिध्द झालयं. रामदास आंदोडे असं मयत युवकाचे नाव असून, त्याचा काल रात्री मृत्यू झाला आहे.
मृत्यूचा अगोदर रामदास याने, आपल्याला दवाखान्यामध्ये कोणतीही सुविधा मिळत नसून, ऑक्सिजन संपलेला आहे. डायलिसिस पेशंट असल्याने बाराव्या दिवशी डायलिसिस आवश्यक असताना ते करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी या व्हिडीओ मध्ये केला आहे . पुढे या व्हिडिओमध्ये त्याने रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करताना, आपल्याला काही झाल्यास, आपला मृत्यू झाला, तर या मृत्यूला कारणीभूत, शासकीय दवाखान्यात प्रशासन राहील. असा आरोपही त्याने त्याच्या मृत्यूपूर्व व्हिडीओ मध्ये केला होता.
https://www.facebook.com/1506067669510655/posts/3077010142416392/
या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ माजली असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, रुग्णालय प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. माहिती घेऊ आणि प्रेस नोट देतो. एवढं सांगून, फोन कट करत आहेत. यामुळे यावर रुग्णालय प्रशासन आणि जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.