धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस कोठडीतील आरोपीला कोरोनाची लागण

पुणे । पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढला असून कोरोनाने आता पोलीस कोठडीतील आरोपीपर्यंत मजल मारली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ही माहिती समोर येताच या आरोपीच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होत अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. … Read more

नरेंद्र मोदींच्या राजकीय चुकांची भरपाई राज्यांना द्यावी लागणार?

Covid -१९ ची गंमत म्हणजे मोदी सगळ्या चुकांचा दोष राज्यांना देऊन स्वतः रक्षक म्हणून बॅकफुटवरुन खेळू शकतात. संचारबंदीदरम्यान योग्य राजकीय भाषणासोबत ठाम भूमिकांचा अभाव हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.

दिलासादायक! पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे  प्रतिनिधी । पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 364 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 681 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. … Read more

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय हॉटस्पॉट कोणते? जाणून घ्या

पुणे प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्राकरिता प्राधिकृत अधिकारी असणारे पुणे व पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजल्यापासून आदेशात नमूद महापालिका क्षेत्र हे हॉटस्पॉट/ कंन्टेटमेंट झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. तसेच कोरोना प्रभावग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 7 तालुके प्रतिबंधित … Read more

हात मिळवू नका, कोरोनाला हरवण्यासाठी आपली मनं जुळवा – सोनाली कुलकर्णी

पुणे । नेहमी सामाजिक कार्यात सक्रीय असणाऱ्या सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सध्या सबंध महाराष्ट्रभरात कोविड पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींबरोबर होत असणाऱ्या भेदभावपूर्ण व्यवहाराविरुद्ध “#विचारबदला” या व्हिडिओच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. कोविड पॉझिटिव्ह असलेल्या किंवा संक्रमण संशयित असलेल्या व्यक्ती प्रति भेदभाव दर्शविण्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. नुकतीच मुंबईच्या लालबागमधील एक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका मराठी … Read more

मुक्तांगण बंद होईल का ?

विचार तर कराल | मुक्ता पुणतांबेकर पु. ल. देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून १९८६ साली माझे आई – बाबा डॉ. अनिता अवचट व डॉ. अनिल अवचट यांनी मुक्तांगण ची स्थापना केली. त्यावेळी उद्घाटनाच्या भाषणात पु. ल. म्हणाले होते, ” आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन करतोय या केंद्राची भरभराट होऊ दे, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देणार … Read more

मोदीजी, देशातील १% अतिश्रीमंत लोकांकडून २% कर घेऊन देश वाचवायची ‘हीच ती वेळ’ !!

अति-श्रीमंतांच्या संपत्तीवर आपत्कालीन कोरोना कर लावून आपले सरकार आवश्यक निधी सहज गोळा करू शकते. याची घटनात्मक तरतूदही अस्तित्वात आहेच.

पुण्यात आज पोलिसासह ५ जणांचा कोरोनामुळं बळी

पुणे । पुण्यात आज दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या दहा दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात करोना आजारावर उपचार घेत असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांचा आज मृत्यू झाला. कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू होण्याची पुण्यातील ही पहिलीच घटना आहे. तर गेल्या काही तासांमध्ये पुण्यातील ससून रुग्णालयात आणखी ४ … Read more

अखेर पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून दारूची दुकान उघडायला परवानगी

पुणे । राज्य सरकारनं अटी-शर्तींसह रेड झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस परवानगी दिल्यानंतरही पुण्यातील मद्यविक्रीची दुकानं खुली होणार नाहीत, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, … Read more

मराठी भाषेच्या विकासासाठी MKCL चं ‘आय.टी.त मराठी’ अॅप

ज्ञानाची देवाण-घेवाण माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेतून व्हावी, तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी भाषेतून उपलब्ध व्हावे, या करिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) प्रयत्नशील आहे. त्यासाठी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून MKCL तर्फे ‘आय.टी.त मराठी’ या अभिनव अॅपची निर्मिती केली गेली आहे.