‘माझं घड्याळाचं दुकान नाही मात्र घड्याळवाले माझे पार्टनर आहेत’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामती दौऱ्यावर आहेत. गुरूवारी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विकास केंद्र बारामती यांच्यातर्फे माळेगाव येथे भरविण्यात आलेल्या ‘कृषिक २०२०’ या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या उदघाटनावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री दादा भुसे, प्रसिद्ध अभिनेते आमीर खान पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार आणि बारामती कृषी विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते.

भिमा कोरेगाव मॅनेज केलेले प्रकरण, चांगले कार्यकर्ते अजूनही तुरूंगात – दिग्विजय सिंह

दिल्ली | भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणी मागील सरकारने मला अर्बन नक्सल ठरवले होते. भिमा कोरेगाव प्रकरण हे मॅनेज केलेले प्रकरण आहे. चांगले कार्यकर्ते अजूनही खोट्या खटल्यांत तुरूंगात आहेत असा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहेत. भिमा कोरेगाव प्रकरण घडले तेव्हा पोलिस अधिकार्‍यांनी मला फोन केला होता. या प्रकरणात ते मला … Read more

अडचणींमध्ये असणार्‍यांसाठी सत्ता वापरणे हेच महाविकासआघाडीचं तत्व – शरद पवार

टीम हॅलो महाराष्ट्र : अडचणींमध्ये असणार्‍यांसाठी सत्ता वापरणे हेच महाविकासआघाडीचं तत्व असल्याच मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांनी व्यक्त केले. ते दौंड येथील कार्यक्रमात बोलत होते. दौंड येथे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन सहाय्यक वैद्यकीय उपकरणांचे मोफत वितरण करण्यात आले. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सर्व … Read more

भिगवन येथून वाळू माफियांकडून २ पिस्टल व ४ काडतुसे जप्त; पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कारवाई

भिगवण जवळील पोंदवाडी फाटा ता.इंदापूर येथुन पुणे ग्रामीण एलसीबी शाखेचे पथकाने तिघे वाळू माफियांकडून दोन पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.संदिप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच रेकॉर्डवरील फरारी आरोपी यांना पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविणे बाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, विदयाधर निचित, दत्ता तांबे, अक्षय जावळे यांचे पथक नेमण्यात आलेले होते.

‘भाजपवाले शब्द पाळणार नाहीत, त्याची सर्वात आधी खात्री मला होती’ – खासदार संजय राऊत

‘भाजपावाले दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं.’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुण्यात आयोजित लोकमत पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात राऊत राऊत यांनी बोलताना सांगितलं. 

उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा – खासदार संजय राऊत

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षातून ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असं नाव करावं असा टोला लगावला होता. तसेच शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्या टीकेला याच टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे.

‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड दाऊद असो, मी कुणाला घाबरत नाही! खासदार संजय राऊत

‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड असो, मी कुणाला घाबरत नाही. तुम्ही घाबरला नाहीत, तर तुमचं कुणी वाकडं करून शकत नाही’, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच’; उदयनराजेंनी साधला शरद पवारांवर निशाणा

“शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष एकदाच जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे थेट नाव न घेता लगावला.

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ पुस्तकावर उदयनराजे सडेतोड भुमिका घेणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजप नेते जयभगवान गोयल यांनी रविवारी नरेंन्द्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करणारे पुस्तक प्रकाशित केले. यानंतर देशभरात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले. अनेकांनी भाजपच्या सदर कृत्याचा निषेध केला आहे. आता शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपण सडेतोड भुमिका घेणार असल्याचे जाहिर केले आहे. ‘आज के … Read more

ट्विटरवर मुलीचा फोन नंबर मागणं तरुणाच्या आलं अंगलट; पुणे पोलिसांनी दिलं तरुणाला हे पुणेरी उत्तर

पोलिसांचे हे ट्विटर हँडेल बरेचदा नियम तोडणाऱ्यांना किंवा अपप्रकार करणाऱ्यांना मिश्कीलपणे समज देतात. असाच काहीसा अनुभव देणार पुणे पोलसांचे ट्विट सध्या व्हायरल झालं आहे.