उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा – खासदार संजय राऊत

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षातून ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असं नाव करावं असा टोला लगावला होता. तसेच शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्या टीकेला याच टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे.

‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड दाऊद असो, मी कुणाला घाबरत नाही! खासदार संजय राऊत

‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड असो, मी कुणाला घाबरत नाही. तुम्ही घाबरला नाहीत, तर तुमचं कुणी वाकडं करून शकत नाही’, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच’; उदयनराजेंनी साधला शरद पवारांवर निशाणा

“शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष एकदाच जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे थेट नाव न घेता लगावला.

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ पुस्तकावर उदयनराजे सडेतोड भुमिका घेणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजप नेते जयभगवान गोयल यांनी रविवारी नरेंन्द्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करणारे पुस्तक प्रकाशित केले. यानंतर देशभरात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले. अनेकांनी भाजपच्या सदर कृत्याचा निषेध केला आहे. आता शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपण सडेतोड भुमिका घेणार असल्याचे जाहिर केले आहे. ‘आज के … Read more

ट्विटरवर मुलीचा फोन नंबर मागणं तरुणाच्या आलं अंगलट; पुणे पोलिसांनी दिलं तरुणाला हे पुणेरी उत्तर

पोलिसांचे हे ट्विटर हँडेल बरेचदा नियम तोडणाऱ्यांना किंवा अपप्रकार करणाऱ्यांना मिश्कीलपणे समज देतात. असाच काहीसा अनुभव देणार पुणे पोलसांचे ट्विट सध्या व्हायरल झालं आहे.

समोर बसलेले लोक मुर्ख आहेत असं समजून भाषण करायचो पण…

पुणे | माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण कौशल्य महाराष्ट्राला चांगलेच ज्ञात आहे. विधानसभा निवडणुकितही देवेंद्र फडणवीस यांनी सभा गाजवत जोरदार बँटींग केल्याने भाजपच्या सर्वाधिक जागा निवडुन आल्या. फडणवीस यांचा मी पुन्हा येईन हा डायलाॅग तर अजूनही सोशल मिडियावर ट्रेंडिंगला आहे. मात्र फडणवीसांकडे असे वक्तृत्व कौशल्य कसे आले यावर आता खुद्द फडणवीस … Read more

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पुन्हा चंद्रकांत पाटील?

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी येत्या १५ जानेवारीला निवड प्रक्रिया होणार आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीच पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदी निवड होईल असे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात बहुमत मिळून देखील भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. पक्षाची सत्ता असताना भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गज नेत्यांची रांग लागली होती. मात्र आता विरोधी बाकावर असताना अनेक … Read more

१२ जानेवारी – राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने – परिवर्तनाचे वाटसरु

राष्ट्रीय युवक दिवस हा एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नाही, तर त्यामागे एक प्रेरणा आहे युवकांना स्वतःमधील शक्ती ओळखण्याची, त्याला दिशा देण्याची..!!

स्वतःच्या रक्ताने चित्र काढणाऱ्या कलाकाराला भेटायचंय..? चला तर मग आमच्यासोबत..!!

पुण्यातील बालगंधर्व आर्ट गॅलरीमध्ये ९ ते ११ जानेवारीमध्ये स्वतःच्या हाताच्या बोटांना सुईने टोचून, काढलेल्या रक्तातून चित्र काढलेल्या प्रल्हाद ठक यांना भेटण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

पुण्यातील मनसे कार्यालय भगव्या रंगात रंगले; मनसे हिंदुत्वाकडे वळणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच आपल्या पक्षाची भूमिका बदलणार असल्याचे सूचक संकेत आता मिळत आहेत. येत्या २३ जानेवारी रोजी मनसेचं पहिलचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी आयोजित केल आहे. या अधिवेशनात मनसे आपल्या पक्षाची भूमिका आणि झेंड्याची घोषणा केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.