विधानसभा निवडणूक २०१९ : पुण्यातील आठ जागांची काँग्रेस राष्ट्रवादीत अशी झाली वाटणी

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुण्याचे जागांचे वाटप जाहीर केले आहे. पुण्यात कोणत्या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि कोणत्या मतदारसंघात काँग्रेस लढणार हे यावरून स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांसमोर निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान असून गतवेळी पुण्याच्या आठी जागी जिंकलेल्या भाजपला पराभूत करणे राष्ट्रवादी … Read more

निवडणुकीचे बिगुल वाचाताच पवारांचे भावनिक ट्विट ; म्हणाले मला काहीच नको

पुणे प्रतिनिधी |  निवडणुकी आयोगाने आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच शरद पवार यांनी ट्विटरवर भावनिक ट्विट केले आहे. या महाराष्ट्राने मला भरभरून दिले आहे. मला आता काहीच नको आहे असे त्या ट्विटमध्ये पवार म्हणाले आहेत. “या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले … Read more

इंदापूरमध्ये होणार मामा भाच्यात लढत ; हर्षवर्धन पाटलांच्या मामाला मिळणार राष्ट्रवादीचे तिकीट ?

मुंबई प्रतिनिधी | हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने इंदापूरची जागा राष्ट्रवादीला सुटणार हा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची रेलचेल असल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे. तर हर्षवर्धन पाटील यांचे मामा अप्पासाहेब जगदाळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादीमधील एका स्थानिक गटाने निर्धार मेळावा घेऊन मागणी केली आहे. सराटी गावचे रहिवासी असणारे अप्पासाहेब … Read more

अनेक शाळांनी HIV बाधित मुलांना प्रवेश नाकारले : गिरीश कुलकर्णी

पुणे प्रतिनिधी | समाजातील HIV बाधित मुलांना मुख्य प्रवाहातील अनेक शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिल्याचं मत स्नेहालय संस्थेचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात ओवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनच्या (VOPA) वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बुलढण्याचे गटविकास अधिकारी शिव बारसाकले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल चव्हाण हेही उपस्थित होते. गिरीश कुलकर्णी म्हणाले, “आम्ही HIV बाधित … Read more

अर्थमंत्री सीतारमन यांचे ‘ते’ वक्तव्य बेजबाबदारपणाचे – पृथ्वीराज चव्हाण  

पुणे प्रतिनिधी  |‘प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचे’ वक्तव्य गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी केलेल वक्तव्य हे बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ओला उबर चे नाव पुढे केले जात … Read more

किंमत मोजावी लागली तरी चालेल पण दिलेला शब्द पाळतो! अजित पवार यांचा पलटवार

किंमत मोजावी लागली तरी चालेल पण दिलेला ‘शब्द’ पाळतो…! अजित पवार यांचा ‘पलटवार’#hellomaharashtra

पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला १७५ किलोचा लाडू अर्पण

पुणे प्रतिनिधी | पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला एका भक्तान मोतीचूर बुंदीचा तब्बल १७५ किलोचा लाडू प्रसाद म्हणून अर्पण केला. ४८ तासांत ६ व्यक्तींच्या मदतीने हा लाडू बनवण्यात आला आहे. पुण्यातील निखिल मालानी यांच्या मार्फत हा १७५ किलोचा लाडूचा प्रसाद गणपतीला अर्पण करण्यात आला आहे. ४८ तासांत ६ कारागिरांच्या मदतीने हा लाडू बनविण्यात आला. हा १७५ किलोचा … Read more

रखडलेल्या नियुक्तीसाठी भावी अधिकाऱ्यांचा दंडवत

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण परीक्षार्थींना अद्यापही सेवेत रुजू करून न घेतल्याबद्दल या ‘भावी अधिकाऱ्यांनी’ पुण्यातील विधान भवनासमोर शुक्रवारी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. तब्बल ८०० ते १००० भावी अधिकाऱ्यांचा यात समावेश असून राज्यसेवेसोबत सहायक मोटार वाहन निरीक्षक शिफारसपात्र हे उमेदवार मागील १६-१८ महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने अद्यापही पदावर … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ : कोथरूडमध्ये भाजप पुन्हा मुसंडी मारणार

पुणे प्रतिनिधी |  पुण्यातील हिंदुत्ववादी पक्षांचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा कोथरूड विधानसभा मतदारसंघ १५ वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना देखील हिंदुत्ववादी पक्षांच्याच ताब्यात राहिला. १९८२ पासून आज तागायत या मतदारसंघात काँग्रेस अथवा राष्ट्रवादी आपला उमेदवार निवडून आणू शकली नाही. सध्या भाजपच्या मेधा कुलकर्णी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यांनी पुन्हा भाजपच्या तिकिटावर दावा सांगितला आहे. … Read more

हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ; इंदापूर काँग्रेसला द्यायला राष्ट्रवादीचा नकार

पुणे प्रतिनिधी | काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी सहकार,पणन, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील सध्या भाजपच्या वाटेवर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडण्यास तयार नसल्यानेच हर्षवर्धन पाटील पक्षावर आणि राष्ट्रवादीवर नाराज आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेल्यास हा काँग्रेसला खूपच मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांना … Read more