हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकवेळा मुंबईसह महाराष्ट्रावर हल्ला करण्याचा इशारा मिळालेला आहे. अनेकदा काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्यांची भीती दाखवण्यात आली आहे. मात्र, आज मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचे संभाषनाची माहिती चौकशी यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
सध्या मुंबईश महाराष्टातील जनतेला हादरवून टाकणारे नवे प्रकरण समोर आले आहे. ते म्हणजे डार्क नेटचे होय. यापूर्वी जम्मू कश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोनमुळे असणाऱ्या संभावित भीतीबाबत चर्चा केल्या जात असत. मात्र, आता मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचे संभाषण झाल्याची माहिती संरक्षण यंत्रणेकडून देण्यात आली असल्याचे महाराष्ट्र सायबर आयजी यशस्वी यादव यांनी सांगितले आहे.
यशस्वी यादव म्हणाले की, “दहशतवादी सहानुभूती बाळगणारे ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर बोलताना दिसतात. पृष्ठभागाच्या जाळ्याच्या तुलनेत डार्क नेट 99 टक्के आहे. टोर ब्राउझर डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज पकडता येत नाही. कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो. दरम्यान, मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांबाबत अनेकदा अलर्ट दिले जातात. आता यादव यांनी माहिती दिल्यानंतर महाराष्ट्रात असणारी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.