खबरदार! सुशांत सिंहच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल कराल तर; महाराष्ट्र सायबर सेलचा कारवाईचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या डेथ बॉडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या फोटोवर बॉलीवूड आणि कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्या वर्गाने संताप आणि विरोध दर्शवला आहे. यावर महाराष्ट्र सायबर सेलने तात्काळ दाखल घेत हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले तर कारवाई करू असा कडक इशाला दिला आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने केलेल्या ट्विटमध्ये, ‘सोशल मीडियावर एक चिंतेत टाकणारा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे फोटो व्हायरल होत आहे. ते अतिशय धक्कादायक आहे. असे फोटो व्हायरल केल्यास कडक कारवाई केली जाईल’ असा इशारा सायबर सेलने दिला आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये सायबर सेलने म्हटलं आहे की, ‘असे फोटो व्हायरल करणं हा गुन्हा आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यावर कारवाई केली जाईल.’

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही माहिती समोर येताच साऱ्यांना धक्का बसला. सिनेसृष्टीपासून ते अगदी क्रिडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपली हळहळ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. मात्र असं असताना सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. अनेकांनी या प्रवृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. असे फोटो व्हायरल करणं हा गुन्हा आहे. यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment