Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी युती? शरद पवार – एकनाथ शिंदे एकत्र येणार ?

Maharashtra Politics
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Politics । स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळच चित्र बघायला मिळतेय. एकीकडे राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी असा थेट सामना होईल असं बोललं जात होतं . मात्र प्रत्यक्षात स्थानिक ग्राउंडवर मात्र परिस्थिती वेगळीच पाहायला मिळते. अनेक ठिकाणी शिंदे गट आणि पवार गट एकत्र दिसतोय, तर काही ठिकाणी भाजप विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र मोट बांधण्याचे चित्र पाहायला मिळतंय. अशातच आता आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या युतीची शक्यता बोलून दाखवली आहे.

काय म्हणाले शशिकांत शिंदे? Maharashtra Politics

सोलापुर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे शिंदेंच्या शिवसेनेने पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली आहे. याच दरम्यान शशिकांत शिंदे यांनी म्हंटल कि, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिंदे शिवसेना यांची कुर्डूवाडी नगर परिषदेत झालेली निवडणूक पूर्व युती भविष्यातील नांदी ठरू शकते. कुर्डूवाडी नगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाची सत्ता रोखण्यासाठी शिंदे गट आणि शरद पवार गट एकत्र आला आहे. यावेळी भाषणात शशिकांत शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदेंचा केवळ वापर करुन घेतला. आपण तर सर्व साधी माणसं आहोत. पण लढणारी माणसे कधीच शरणागती घेत नसतात. कुर्डूवाडी मध्ये तुम्ही लोक आज एकत्र आलाय कदाचित भविष्यातल्या राजकारणाची नांदी ठरू शकते. शशिकांत शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. भाजपकडून शिंदे गटातील स्थानिक नेते फोडले जात आहेत असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाऊन अमित शाह यांनाही भेटले होते. तर दुसरीकडे शरद पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध राहिलेत. मुख्यमंत्री असतानाही शिंदे आणि पवारांच्या भेटीगाठी या होतच होत्या. त्यामुळे आज शशिकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या युतीच्या चर्चाना यामुळेच बळ मिळताना दिसतंय. भविष्यात खरोखरच शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा उलटफेर बघायला मिळेल.