तीनही छत्रपती एकाच व्यासपीठावर दिसणार; नव्या अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची साताऱ्यात स्थापना

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजासाठी नव्या अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची स्थापना केली आहे. मराठा आरक्षणासह कष्टकऱ्यांचा लढ्यासाठी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी राजकारण विरहित अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची स्थापना केली आहे. उद्या सातारा येथे तीन छत्रपतींच्या उपस्थितीत अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची स्थापना होणार आहे.

या कार्यक्रमाविषयी माहिती देताना नरेंद्र पाटील यांनी सांगितलं कि, माझे वडील कै. माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने एका नवीन कार्यास सुरुवात करत आहे. त्यानुसार कष्टकऱ्यांचा लढ्यासाठी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर लढण्यासाठी अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची स्थापना करणार आहे. उद्या २८ जानेवारी सकाळी ११ वाजता सातारा जिल्हा बँकेत हा कार्यक्रम पार पडणार आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात तीनही छत्रपती एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते व खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले,आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत फाउंडेशनचे उदघाटन व शुभारंभ होणार आहे. तेव्हा उद्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केलं आहे. तसेच ज्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य नाही त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहावा, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News

 

 

 

 

 

You might also like