भाजपकडून आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम करण्याचे पाप; नाना पटोलेंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या केंद्र सरकारवर विरोधकांकडून अनेक प्रकरणावरून टीका केली जात आहे. या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आंबेडकर चळवळीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मनुवादी विचाराच्या भाजप सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले. हि चळवळ संपवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.

काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचा पदग्रहण सोहळा आज पार पडला. यावेळी पटोले म्हणाले की, कॉंग्रेस हा विचारांचा पक्ष आहे, सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा पक्ष आहे. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालत आहे. मात्र, सध्या बाबासाहेबांचे संविधानच बदलण्याचे काम काहींकडून केले जात आहे. सर्व काही खासगीकरण करून आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव आखला जात आहे.

केंद्र सरकारकडून शेतकरी, कामगार, तरुण वर्गाला संपवण्याचे काम केले जात आहे. बाबासाहेबांचा विचार टिकला तरच देश नक्की वाचू शकेल. मात्र, त्यासाठी आंबेडकरांचा विचार, काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवने गरजेचे आहे. देशात परिवर्तन घडेल तर ते महाराष्ट्रातूनच, असेही यावेळी पटोले यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment