Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. पुणे, कोल्हापूर या शहरांमध्ये पावसानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा शाळांसह कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने दहावी आणि बारावीच्या उद्या होणाऱ्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात (Maharashtra Rain) आल्या आहेत.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पुरवणी परीक्षा ह्या उद्या दिनांक 26 जुलै रोजी होणार होत्या. मात्र सध्या राज्यातल्या बहुतांश शहरांमध्ये पावसाचा जोर वाढला असून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्यात (Maharashtra Rain) यलो ओलड जारी करण्यात आलाय. म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कधी होणार परीक्षा ? (Maharashtra Rain)
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 26 जुलै रोजी होणाऱ्या दहावी बारावीच्या बोर्डाच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 31 जुलै रोजी होणार आहे. तर इयत्ता बारावीची (Maharashtra Rain) बोर्ड पुरवणी परीक्षा 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.
उद्या दिनांक 26 जुलै रोजी दहावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयांचा पेपर सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान नियोजित करण्यात आला होता. मात्र आता हा पेपर दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान होणार आहे. तर बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा वाणिज्य आणि संघटक व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान एमसीव्हीसी पेपर दोन हे तीन पेपर होते हे बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचे तीनही पेपर आता 9 ऑगस्ट रोजी होणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन (Maharashtra Rain) देखील करण्यात आलं आहे.