हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसांपासून ओसरलेला महाराष्ट्रातील पाऊस (Maharashtra Rain Update) आजपासून पुन्हा एकदा झोडपण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या काळातच वरुणराजा पुन्हा एकदा कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. खास करून मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरात पावसाची बरसात पाहायला मिळेल. मुंबईत ढगाळ वातावरण कायम राहील असं म्हणत हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता- Maharashtra Rain Update
आजपासून पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळाले. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग य तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय नाशिक आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तर संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)
विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, भंडारा, वाशीम आणि यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. याशिवाय, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय झाले राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे