हॅलो महाराष्ट ऑनलाईन Maharashtra Rain Updates । महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
विश्रांतीनंतर पावसाची तुफान बॅटिंग – Maharashtra Rain Updates
मागच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र कालपासून पुन्हा एकदा त्याने रौद्र रूप दाखवलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वाऱ्याची द्रोणीय रेषा वायव्य राजस्थानपासून मध्यप्रदेश, विदर्भ मार्गे मराठवाड्यापर्यंत गेल्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कोकणात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १४ ते १९ जूनदरम्यान कोकणात अति मुसळधार पावसाचा धोका कायम राहणार आहे. मुंबईत आज ५० ते ६० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ठाण्यासाठी १४ आणि १५ जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रायगडसाठी १४ जून रोजी रेड अलर्ट आणि पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. Maharashtra Rain Updates
पुण्यात पावसाचा कहर –
दरम्यान, पुणे जिल्ह्यात काल पावसाचा जोरदार तडाखा (Maharashtra Rain Updates) बघायला मिळाला. काल दुपारनंतर सुरु झालेला पासून सायंकाळी उशीरापर्यंत जोरदार बरसत होता. मुंढवा, खराडी, हडपसर, फुरसुंगी, कोंढवा, कात्रज, धनकवडी, आंबेगाव नन्हे, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, कोथरूड, बावधन, औंध, बोपोडी, पाषाण या भागांमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला. पिंपरी-चिंचवडमध्येही शुक्रवारी रात्री तुफान पाऊस झाला आहे. पुण्यातील रस्त्याना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळे कामावरून परतणाऱ्या पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तुफान पाऊस झाल्यानं सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.