हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Rain Updates। मागील ७ दिवसापासून सुरु असलेली पावसाची रिपचीप आता आणखी ४ दिवसही अशीच कायम असणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 ते 28 मेपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील भागात पावसाचा जोर अधिक असेल.
कोकणात अवकाळी पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे. चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबोली, भुईबावडा, कुरुळ घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. वीज पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
IMD has degraded it's 'Orange Alert' 🟠 to 'Yellow Alert' 🟡 for today & tomorrow for Mumbai. #MumbaiRains pic.twitter.com/PzHdb8WUN5
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) May 23, 2025
कशी राहील पावसाची स्थिती ? Maharashtra Rain Updates
मुंबई, सोलापूर, अहिल्यानगर, पालघर, ठाणे धाराशिव, परभणी बीड या जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, यवतमाळ, बुलढाणा या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात पावसाच्या हलक्या सऱ्या कोसळतील असं हवामान विभागाने म्हंटल आहे. Maharashtra Rain Updates
एकीकडे राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं असताना दुसरीकडे मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने सुरु आहे. दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्राच्या दक्षिण भागासह, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भागात पोहचणार आहे. त्यामुळे मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.




