हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Rain Updates । राज्यात शेतकरी पाऊसाची वाट पाहत असताना हवामान खात्याने 30 जून रोजी मान्सूनच्या अंदाजाबाबतची महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान विभागाने मान्सूनचा अंदाज वर्तवताना सांगितले आहे, कि राज्यात मान्सूनचा प्रभाव हा काही भागात दिसून येतआहे. यात महत्त्वाचे म्हणजे पुणे जिल्हासाठी हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तर इतर भागामध्ये म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .
कोणकोणत्या जिल्ह्याना येलो अलर्ट – Maharashtra Rain Updates
अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे राहणार आहेत. राज्यातील येलो अलर्ट जिल्ह्यांमध्ये बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, कोल्हापूर, सांगली, जळगाव आणि अहिल्यानगर यांचा समावेश येतो. तर नैऋत्य मान्सून पाऊस देशभर सक्रीय झाला आहे. त्यांमुळे या सर्व जिल्हा प्रशासनाला अलर्ट राहावे लागेल.. पुणे शहरात विचार केला तर या आठवड्याच्या शेवटी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे, तर आजूबाजूच्या घाट भागतील तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. पावसाची आकडेवारी पहिली तर सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या गेल्या २४ तासांतील नोंदलेला पाऊस हा भोर ४१.५, कुर्वंडे २६.५,निमगिरी १६.५,लावले ८.२, तळेगाव ४.०,नारगाव ४.०, नारायणगाव २.५, चिंचवड २.०, शिवाजीनगर २.०, दुदुलगाव १.०,पुरंदर १.०( मिमी ) इतका पाऊस झाला आहे. तसेच येणारे काही दिवस पुण्यातील वातावरण हे ढगाळ स्वरूपाचे असणार आहे, अधूनमधून हलका पाऊस पडण्याची शक्यता (Maharashtra Rain Updates) हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
त्याच बरोबर पुण्याव्यतिरिक्त राज्यात इतर भागातही हलका व मध्यम पाऊस पडला आहे. त्यात कोल्हापूर (२१.९ मिमी), नाशिक (१२.८ मिमी), नंदुरबार (१८.७ मिमी), पालघर (२७.५ मिमी), रायगड (२२.४ मिमी), ठाणे (१४.९ मिमी), आणि धुळे (१०.५ मिमी). या जिल्हाच समावेश आहे. याच दरम्यान मात्र मराठवाडा कोरडा राहणार आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर मान्सूनने देशाच्या इतर राज्यांतही जोरदार आगेकूच सुरू ठेवली आहे पावसाचा हाच जोर आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.




