राज्यात लॉकडाऊनसोबत चिंताही वाढली; दिवसभरात सापडले तब्बल २ हजार ३४७ कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या ३३ हजार पार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. आज २३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ७३ हजार २३९ नमुन्यांपैकी २ लाख ४० हजार १८६जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३ हजार ५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ४८ हजार ५०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोविड १९ पोर्टलवरील विश्लेषणानुसार, राज्याचे मार्च २०२० मध्ये प्रयोगशालेय नमुन्याचे दैनंदिन प्रमाण ६७९ एवढे होते ते मे २०२० मधील पहिल्या पंधरवडयात दिवसाला ८,६२८ प्रयोगशालेय नमुने इतके वाढले आहे. राज्याच्या प्रयोगशालेय सर्वेक्षणात मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे १३ पट वाढ झाली आहे, हे यावरुन स्पष्ट होते. सध्या देशात दर दशलक्ष लोकसंख्येमागे १६३० प्रयोगशाळा चाचण्या होत असून महाराष्ट्रात हे प्रमाण २१३७ एवढे आहे.

राज्यात ६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या ११९८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ९,औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये ३, रायगडमध्ये ३, आणि ठाणे जिल्ह्यात १, पनवेल शहरात १,लातूर मध्ये १, तसेच अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३४ रुग्ण आहेत तर २२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये ( ६५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २०,१५० (७३४)
ठाणे: २२८ (४)
ठाणे मनपा: १५५० (१८)
नवी मुंबई मनपा: १३६८ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ५२० (६)
उल्हासनगर मनपा: १०१
भिवंडी निजामपूर मनपा: ४८ (२)
मीरा भाईंदर मनपा: ३०० (४)
पालघर: ६१ (२)
वसई विरार मनपा: ३५९ (११)
रायगड: २३९ (५)
पनवेल मनपा: २०६ (११)
ठाणे मंडळ एकूण: २५,१३० (८११)

नाशिक: १०५
नाशिक मनपा: ७१ (१)
मालेगाव मनपा: ६७५ (३४)
अहमदनगर: ५६ (३)
अहमदनगर मनपा: १९
धुळे: १० (३)
धुळे मनपा: ७० (५)
जळगाव: २०५ (२६)
जळगाव मनपा: ६१ (४)
नंदूरबार: २३ (२)
नाशिक मंडळ एकूण: १२९५ (७८)

पुणे: १९९ (५)
पुणे मनपा: ३४६४ (१८८)
पिंपरी चिंचवड मनपा: १५८ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३६४ (२४)
सातारा: १३१ (२)
पुणे मंडळ एकूण: ४३२५ (२२४)

कोल्हापूर: ३० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ४२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: ९५ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १९१ (५)

औरंगाबाद:९७
औरंगाबाद मनपा: ८४२ (३१)
जालना: २८
हिंगोली: ९६
परभणी: ५ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: १०६९ (३२)

लातूर: ४२ (२)
लातूर मनपा: २
उस्मानाबाद: ७
बीड: ३
नांदेड: ५७
नांदेड मनपा: ६२ (४)
लातूर मंडळ एकूण: १२३ (६)

अकोला: २८ (१)
अकोला मनपा: २४१ (१३)
अमरावती: ६ (२)
अमरावती मनपा: १०४ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: ३० (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ५११ (२९)

नागपूर: २
नागपूर मनपा: ३५५ (२)
वर्धा: २ (१)
भंडारा: ३
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३६८ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: ३३ हजार ५३ (११९८)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment