साताऱ्यात एसटी स्टॅंडवरील शिवशाही बस पेटवणारा तरुण ताब्यात

सातारा । साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला आगीच्या हवाली करणाऱ्या तरुणाला पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. एका तरुणाने एसटी स्टॅंडवर उभ्या असलेल्या बसला आग लावली होती. ही आग पसरली आणि शेजारी उभ्या असलेल्या इतर ५ बस गाड्यांनीही पेट घेतला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पेटलेल्या बस गाडया विझवल्या.

तरूणाने लावलेल्या आगीत सहाही शिवशाही बस गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. बस गाड्यांना आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस दलही घटनास्थळी पोहोचलं होत. या आगीत शिवशाही बस जळून खाक झाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या घटनेनंतर बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

“सायंकाळी जवळपास 5 वाजेच्या सुमारास शिवशाही बसेसला आग लागल्याची घटना घडली. एसटी महामंडळ, अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने मोठं नुकसान टळलं. अन्यथा आणखी गाड्यांचं नुकसान झालं असतं”, अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like