सातारा | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2021 ही दि. 3 एप्रिल 2022 रोजी जिल्ह्यातील 32 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील या उपकेंद्रावर सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत 1973 चे कलम 144 कलम अपर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे यांनी लागू केलेले आहे.
महाराष्ट्र गट-क परीक्षा अभसिंहराजे भोसले, इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, शेंद्रे सातारा, अनंत इंग्शिल स्कूल, सातारा, आण्णासाहेब कल्याणी हायस्कूल, सातारा, कन्या शाळा, सातारा, लालबहादूर शास्त्री कॉलेज, सातारा, महाराजा सयाजीराव विद्यालय ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, सातारा, न्यु इंग्शिल स्कूल, सातारा, यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स-अ, सातारा, यशवंतराव चव्हाण इन्सिटट्यु ऑफ सातारा-ब, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेकनिक, पानमळेवाडी, सातारा, धनंजयराव गाडगीळ कॉमर्स कॉलेज, सातारा, अरविंद गळवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पानमळेवाडी, सातारा, निर्माला कॉन्व्हेंट स्कूल, सातारा, कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, सातारा, श्रीपतराव पाटील हायस्कूल, सातारा, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा, सौ. सुशिलादेवी साळुंखे माध्यमिक विद्यालय, सातारा, भवानी विद्या मंदिर, सातारा, सरस्वती विद्यालय, कोरेगाव, डी.पी. भोसले कॉलेज, कोरेगाव, दि मॉर्डन इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कोरेगाव, सेठ रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड, एस.एम. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, कराड, टिळक हायस्कूल, कराड, यशवंत हायस्कूल, कराड, सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, विद्यानगर, कराड, सदगुरु गाडगे महाराज कॉलेज-ब, विद्यानगर कराड, शासकीय तंत्रनिकेतन, कराड, विठामाता विद्यालय ॲण्ड ज्युनिअर कॉलेज कराड, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
या आदेशान्वये परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालचे 100 मीटर परिसरात परिक्षार्थी परिक्षेसाठी नेमलेले अधिकारी , सुरक्षा अधिकारी,कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तींना महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2021 परीक्षेसाठी प्रवेश करण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. तसेच दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शाळा- महाविद्यालयाचे परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, एस. टी. डी बुथ. आय. एस. डी. बुथ / फॅक्स केंद्रावर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॅझीस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप परिक्षा केंद्राच्या 100 मीटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परिक्षा केंद्रात नेण्यास मनाई आहे.