मुंबई । केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा ग्रोथ रेट वाढत आहे. मास्कचा वापर टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांना महागात पडेल, असा गंभीर इशाराच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे.
दुसरीकडे शाळा सुरु होत असताना मुलांची सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे शाळांच्या निर्जंतुकीकरणासाठी शिक्षकांना जे शक्य असेल ते त्यांनी करावं. नाहीतर एखाद्याला कंत्राट देऊन शाळांचं निर्जंतुकीकरण करावं, अशी विनंती टोपे यांनी केली आहे.
राज्यात सध्या कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पाडण्याची परवानगी राज्य सरकारनं दिलेली आहे. मात्र, आता लग्नासाठी उपस्थिती संख्या वाढवण्याचे संकेतही टोपे यांनी दिले आहेत. तसंच कुणीही कोरोनाला गृहित धरू नये, सर्वांनी काळजी घ्यावी, स्वंयशिस्त पाळली पाहिजे, तरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करणं शक्य असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले.
. तर मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वेसेवा बंद करण्याचा राज्य सरकार घेईल निर्णय; 'हे' आहे कारण
वाचा सविस्तर- 👉 https://t.co/hrPudPWTwI#mumbai #HelloMaharashtra #delhi #railway— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 20, 2020
गुड न्यूज! सिरमची कोरोनावरील लस येणार फेब्रुवारीत! किंमत असेल फक्त..
वाचा सविस्तर👉 https://t.co/HeLKB8nbQP#coronavirus #coronavaccine #HelloMaharashtra #siram— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 20, 2020
७ वर्षांपूर्वीचं दुकानाचं नाव ठेवलं होत 'कोरोना', आता ठरतेय फायदेशीर, जाणून घ्या?
वाचा सविस्तर- 👉 https://t.co/u9C64KcloO#HelloMaharashtra #corona #Viral #viralnews— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 20, 2020
खळबळजनक! अजित पवारांच्या शेजाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं
वाचा सविस्तर-👉 https://t.co/t7NbVGe62e@AjitPawarSpeaks @NCPspeaks @MumbaiNCP #suicidenote #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 20, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in