Maharashtra SSC Result 2025 Date : 10 वीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार; समोर आले मोठे अपडेट्स

Maharashtra SSC Result 2025 Date
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इयत्ता 10 वीच्या निकालाबाबत (Maharashtra SSC Result 2025 Date) सर्वात मोठे अपडेट्स समोर आले आहेत. 10 वी च्या विद्यार्थ्यांचा परीक्षा निकाल हा १५ मे च्या आत जाहीर होण्याची शक्यता आहे. खरं तर १२ वी चा निकाल जाहीर झाल्यानंतरच 10 वी चा निकाल कधी कळणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता शिगेला पोचलीय. अखेर राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबत मोठी अपडेट दिली होती. गोसावी यांनी दहावी आणि बारावीचा निकाल 15 मे 2025 च्या आधीच जाहीर होईल असं त्यांनी म्हंटल आहे.

दहावीच्या निकालाचे काम (Maharashtra SSC Result 2025 Date) आता अंतिम टप्प्यात आलं आहे. दरवर्षी बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जात असतो आणि त्यानंतर मग दहावीचा निकाल लागतो. दहावीचा निकाल साधारणता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र यावर्षी १२ विचा निकाल लवकर लागला. ५ मे रोजी हा निकाल जाहीर झाला होता. तस बघितलं तर १२ वी च्या निकालानंतर १० दिवसात १० वी चा निकाल लागतो. त्यामुळे यंदा १५ मे पर्यंत १० विचा निकाल लागू शकतो. यामुळे सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

कुठे पाहाल 10 वी चा निकाल- Maharashtra SSC Result 2025 Date

तुम्हाला सुद्धा १० विचा निकाल चेक करायचा असेल तर mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in, mh-ssc.ac.in, sscboardpune.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

कसा चेक कराल १० वी चा निकाल-

सर्वात आधी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
तिथे ‘SSC Result 2025’ या लिंकवर क्लिक करा.
आपला रोल नंबर व आईचे नाव भरून सबमिट करा.
यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तो डाउनलोड व प्रिंट करू शकता.