Maharashtra Teacher Recruitment 2024 | जे लोक शिक्षक भरतीची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती सुरू होणार आहे. आता शिक्षकांच्या 21,678 जागांपैकी मुलाखती शिवाय 16799 पदे होती तर 1185 उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
यानंतर आता शाळा कागदपत्रांची पडताळणी करून उमेदवारांचे नियुक्ती करण्यात आली आहे. अशी शिक्षक विभागाच्या वतीने माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता अनेक वर्षापासून वाट पाहणाऱ्या उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
यामध्ये मुलाखतीन शिवाय 16799 मधील 5717 जागांकरिता शिफारस केलेली नाही. त्यामुळे आरक्षणाचा विचार करता माजी सैनिक 15 टक्के उमेदवार नसल्यामुळे 2357 जागा आणि अंशकालीन 10टक्के उमेदवार नसल्यामुळे 1536 जागा तसेच खेळाडू यांना 5% उमेदवार नसल्यामुळे 568 रिक्त जागा राहिलेल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर 16 डिसेंबर 2023 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत नोंदणी केलेल्या जिल्हा परिषद 12522 मनपा 2951 नगरपालिका 477 खाजगी शिक्षण संस्था 5728 अशा एकूण 21 हजार 678 रिक्त पदांच्या जाहिराती आलेले आहेत. तसेच मुलाखती शिवाय 16799 आणि मुलाखतीसह 4879 अशी एकूण 21 हजार 668 रिक्त जागा भरण्यासाठी कार्यवाही होणार आहे.
उमेदवार उपलब्ध न झाल्याने दुसरी फेरी होणार | Maharashtra Teacher Recruitment 2024
यावेळी पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यम 1585मराठी माध्यम 870 उर्दू माध्यम 640 जागा तसेच इयत्ता सहावी ते आठवी गटातील गणित आणि विज्ञान 2238 रिक्त जागा राहिलेल्या आहेत. पहिल्या फेरीत समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध नसल्याने दुसरी फेरी घेण्याची गरज पडलेली आहे. आणि मुलाखती शिवाय जाहिरातीतील रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
मुलाखतीसह पद भरतीसाठी 4879 उमेदवार
या मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय असलेल्यांना 1189 संस्थांना 4879 रिक्त पदांसाठी योग्य ती प्रक्रिया करून 1:10 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जातात. मुलाखत आणि अध्यापन कौशल्य याच्या आधारे त्यांची निवड केली जाते यासाठी 30 गुणांची तरतूद केलेली असून उमेदवारांची निवड संस्था करणार आहे.