मुंबई । कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून गेली साडेतीन महिने बंद असलेली राज्यभरातील हॉटेल्स व लॉज ग्राहकांसाठी येत्या ८ जुलैपासून सुरू होणार आहेत. मिशिन बिगीन अगेन अंतर्गंत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज हे यांच्या क्षमतेच्या ३३ टक्के ग्राहकांनाच राहण्याची संमती राज्य सरकारने दिली आहे.
पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान लक्षात घेऊन हा उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद नागपूरसारख्या शहरांसाठी व महापालिका असलेल्या शहरांसाठी कन्टेंनमेंट झोनपासून बाहेर असलेल्या हॉटेलला परवानगी देण्यात आली आहे.
Maharashtra government to allow hotels outside containment zones to operate at 33 per cent of capacity from July 8: Order
— Press Trust of India (@PTI_News) July 6, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी हॉटेल्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हॉटेल्स सुरू करण्यासाठी सशर्त मंजुरी देण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार काही अटी- शर्तींसह आज हॉटेल सुरू करण्याला परवानगीही देण्यात आली आहे. हॉटेल्स तसेच लॉजेस सुरू करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल याची खात्री करण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करावी लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
हॉटेल्समध्ये गर्दी न होऊ देण्याची जबाबदारी ही हॉटेल चालकांची असणार आहे. थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करणं आवश्यक आहे. हँड सॅनेटायझरची मोफत व्यवस्था करणं आवश्यक आहे. गेस्ट रुम, सार्वजनिक ठिकाण आणि लॉबी या ठिकाणीही सॅनेटायझर ठेवणं आवश्यक आहे. ग्लोव्ज, फेस मास्क वापरणं बंधनकारक. QR कोड, ऑनलाइन फॉर्म्स, डिजिटल पेमेंट्स जसं ई वॉलेट वगैरे हे सगळं हॉटेल्सनी सुरु करावं. असेही निर्देश देण्यात आले आहेत.
हे आहेत नियम
हॉटेलची जी क्षमता आहे त्याच्या ३३ टक्के पाहुण्यांना संमती दिली जाऊ शकते.
रेस्तराँमध्येही फक्त राहण्यासाठी संमती देण्यात आलेली आहे
ज्यावेळी ग्राहक येतील तेव्हा थर्मोमीटरने तापमान पाहणं गरजेचं आहे
रिसेप्शन टेबलवर स्क्रिनिंग करणं सक्तीचं असणार आहे
सॅनेटायझरचा वापर हा सक्तीसाठी करण्यात आला आहे
हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये असलेले गेमिंग झोन, स्विमिंग पूल, जिम हे बंदच राहणार आहेत
जे ग्राहक हॉटेल्समध्ये राहण्यासाठी येतील त्यांना मास्क वापरणं अनिवार्य असणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”