‘गर्लफ्रेंड्स’च्या शोधात वाघोबाची तब्बल २ हजार किलोमीटर भटकंती, लोक म्हणाले,’फाइंड ऑन टिंडर..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर सध्या एका वाघाची चांगली चर्चा होता आहे. कारणही तसंच आहे. प्रत्येक तरुण-तरुणीला आपला एक जोडीदार असावा असं नेहमी वाटतं असतं. बरेच जण आपल्या परफेक्ट पार्टनर शोधण्यासाठी शक्य तितका प्रयन्त करतात. काही जण मित्र परिवारात, तर काही सोशल मीडियावर आपला जोडीदार शोधतांना दिसतात. मात्र, योग्य जोडीदारासाठी केलेले सर्व प्रयत्न फार खुजे वाटू लागतात जेव्हा आपण महाराष्ट्रातील ज्ञानगंगा अभयारण्यात सध्या वास्तव्याला असणाऱ्या एका वाघाची गोष्ट ऐकतो. भारतीय वनसेवेत वन अधिकारी (आयएफएस) पदावर असलेल्या परवीन कसवान यांनी नुकतीच ट्विटरवर एका वाघाची कहाणी शेअर केली आहे. या वाघाने जोडीदाराच्या शोधात तब्बल २००० कि.मी चा पायदळ केल्याचे सांगितलं आहे.

या वाघाच्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल सांगताना कासवान यांनी एका नकाशासोबत या वाघाचा फोटो ट्विटरवर शेअर आहे. आपल्या ट्विट मध्ये ते लिहतात ,” या वाघ बरेच अंतर चालून आता ज्ञानगंगा अभयारण्यात स्थायिक झाला आहे. शेत, कालवा, जंगल, रस्ते असा तब्बल २ हजार किलोमीटरचा या वाघाने कुठलाही मानवी संघर्ष न करता पूर्ण केला आहे. विश्रांती घेत रात्रीच्या वेळी चालत त्याने हा प्रवास आपल्या एका जोडीदाराच्या शोधात केला आहे. या संपूर्ण प्रवासात आम्ही त्याच्यावर सतत नजर ठेवून होतो”.

वाघाच्या हालचालीवर (मूव्हीमेंट) कसे लक्ष ठेवले याबाबत सुद्धा कासवान यांनी माहिती देत ट्वीटमध्ये लिहिले आहे, “मार्च २०१९ मध्ये या वाघाला आम्ही रेडिओ-टॅग केलं होत. त्यामुळं आपण या प्रवासासाठी त्याला लागलेला काळ आणि वेग याची गणना करू शकलो. वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी (ट्रॅकिंग) व्हीएफएफ रेडिओ आणि जीपीएस ट्रॅकर्स यांचा वापर होतो.”

या बब्बर शेरची म्हणजेच वाघाची ट्विटरवर कहाणी वाचून बऱ्याच लोकांनी फारच मजेशीर कंमेंट्स केल्या आहेत. एका ट्विटरवर युझूरने लिहाल आहे, ” हा वाघ ज्या वाघिणीच्या नशिबात आहे ती किती नशिबवाण असेल, कि जिच्या शोधात या वाघाने तब्बल २ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. जेव्हा तिची भेट या वाघाची होईल तेव्हा तिला किती प्रेम मिळेल. ”तर दुसऱ्या एका युझूरने वाघाच्या हक्काबद्दल एक मजेशीर कमेंट करत लिहिलं आहे,” जसे माणसाकडे टिंडर आहे तसेच काहीशी सुविधा वाघांसाठी सुद्धा उपलब्ध करून द्यायला हवी.” असेच बरेच मजेशीर ट्विट खाली आपण वाचू शकता..

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment