उन्हाळ्यात घरात बसवेना? तर महाराष्ट्रातील या कूल ठिकाणांना अवश्य द्या भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळा सुरू झाला की घरात थांबणे देखील नकोसे होऊन जाते. त्यावेळी हमखास एकदा तरी आपण कुटुंबासह कुठेतरी फिरायला जावे असा विचार मनात येतो. (Maharashtra Tourism Places) असाच विचार तुम्ही देखील करायचा असेल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील शांतता, सुखद गारवा, आणि निवांत क्षण देणारी काही खास ठिकाणांची (Summer Vacation) भेट घडवून देणार आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्ही तुमचे ताण-तणाव झटक्यात विसरून जाल…

लोणावळा

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्यटक हे लोणावळ्याला भेट देण्यासाठी जात असतात. लोणावळ्या मधील हिरवाई धबधबे पर्वत आणि मनमोहक असणारे दृश्य पर्यटकांना वेड लावून सोडते. लोणावळ्यामध्ये अशी अनेक ठिकाणी आहेत जिथे तुम्ही फॅमिलीसोबत उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटू शकता. याठिकाणी आंबी व्हॅली, भिवपुरी, जुम्मापट्टी धबधबा, पवना तलाव, लोणावळा तलाव, राजमाची किल्ला ज्याला तुम्ही अवश्य भेट द्यायला हवी.

आंबोली

उन्हाळी सुट्टीत भेट देण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील आंबोली. आंबोलीमध्ये तुम्ही घनदाट जंगल आणि पर्वताच्या मधोमध बसलेल्या हिल स्टेशनला भेट देऊ शकता. तसेच घाटातून प्रवास करण्याचा आनंद लुटू शकता. आंबोलीत गेल्यानंतर तुम्ही महादेवगड पॉइंट, कोकण किनारा, नागट्टा फॉल्स, नारायण गड, बॉक्साईट माईन्स अशा अनेक विविध ठिकाणांना भेट देऊ शकता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात अवश्य आंबोलीला भेट द्या.

मालवण

मालवण म्हणलं की आपल्याला समुद्रकिनारा, उंच झाडी, सर्वत्र असलेले हिरवेगार दृश्य डोळ्यासमोर उभे राहते. मालवणला गेल्यानंतर तुम्ही क्षणात शहराकडच्या गर्दीला वरदळीला आणि रोजच्या धावपळीला विसरून जातात. याठिकाणी गेल्यास तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहताल. वेगवेगळ्या मालवणी पदार्थांचा आस्वाद घेऊ शकाल. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर मालवणला एकदा तरी भेट द्या.

इगतपुरी

निसर्गाच्या प्रेमात वेडे असलेल्या पर्यटकांनी आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आतुरलेल्या लोकांनी एकदा तरी इगतपुरीला भेट द्यावी. इगतपुरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला किल्ले, नद्या, धबधबे, अभयारण्य पाहण्याचा आनंद घेता येईल. यामुळे झटक्यात तुम्ही तुमच्या ताणतणावातून बाहेर याल. इगतपुरीच्या आजूबाजूला अनेक ऐतिहासिक स्थळे देखील आहेत ज्याला तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत भेट देऊ शकता.

महाबळेश्वर

स्वर्ग पाहायचा असेल तर पावसाळ्यात महाबळेश्वरला जावा, असे आपण अनेक वेळा ऐकले असेल. परंतु उन्हाळ्यामध्ये देखील महाबळेश्वर फिरण्यासाठी सर्वात उत्तम हिल स्टेशन ठरू शकते. महाबळेश्वरमध्ये गेल्यानंतर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात आल्याचा अनुभव घ्याल. तसेच महाबळेश्वरमधील वेगवेगळ्या मंदिरांना ठिकाणांना भेट देऊन सुट्टीचा आनंद लुटू शकाल. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत महाबळेश्वरला भेट देण्याचा प्लॅन नक्की बनवा.