Maharashtra Tourism : देशातील एकमेव गणेश मंदिर जिथे पोहचतात समुद्राच्या लाटा ; उन्हाळ्याच्या सुट्टीत आवश्य भेट द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Tourism : सुंदर समुद्रकिनारे ,निसर्ग संपन्नतेने नटलेला असा हा महाराष्ट्र पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. सुट्ट्या असो की विकेंड महाराष्ट्रातील काही पर्यटन स्थळे नेहेमीच गर्दीने फुल्ल असतात. आता लवकरच उन्हाळी (Maharashtra Tourism) सुट्टी सुरु होईल तुम्ही सुद्धा उन्हाळी सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचा प्लॅन केला असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास महाराष्ट्रीयन पर्यटन स्थळे घेऊन आलो आहोत जिथे गेल्यावर तुम्हाला सुट्टीचा आनंद जरूर लुटता येईल.

महाराष्ट्रातील रत्नागिरी हे केवळ हापूस आंबा आणि माशांसाठी प्रसिद्ध नाही तर ते अतिशय सुंदर ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. चला जाणून घेऊया रत्नागिरीत भेट देण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ?

आरे वारे बीच

आरे वारे बीच हा महाराष्ट्रातील (Maharashtra Tourism) फारच कमी लोकांना माहिती असलेला समुद्रकिनारा आहे. जो रत्नागिरी ते गणपतीपुळे ला जोडला गेला आहे. कोकणातून रत्नागिरीकडे आल्यावर मध्यभागी हा बीच आहे. रस्त्याच्या एका बाजूला समुद्रकिनारा आणि दुसऱ्या बाजूला टेकड्या आहेत. रस्ता ओलांडल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचाल त्याला आरे-वारे व्ह्यू पॉइंट म्हणतात. ह्या बीच वरील पाणी स्वच्छ आहे. शिवाय तुम्हाला शांततेत वेळ घालवायचा असेल तर हा बीच परफेक्ट आहे.

रत्नदुर्ग किल्ला (Maharashtra Tourism)

हा रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहरापासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावरच आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात एक छुपा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग थेट अरबी समुद्रात बाहेर पडतो. रत्नागिरी (Maharashtra Tourism) शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना हा किल्ला म्हणजे मुख्य आकर्षण वाटतो. विशेष म्हणजे या किल्ल्याच्या तीनही बाजूने अरबी समुद्र वेढला आहे. या किल्ल्याच्या आग्नेयला जमीन तर किल्ल्याच्या पायथ्याशी मिरकर वाडा हे बंदर आहे. या किल्ल्याचा आकार घोड्याच्या नाले सारखा तर किल्ल्यावरून दिसणारा सुंदर समुद्र इथल्या पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो.

या किल्ल्याचे क्षेत्रफळ हे 120 एकर इतका आहे. किल्ल्याची लांबी अंदाजे 1300 m आणि रुंदी 1000 m आहे तर किल्ल्याच्या दक्षिण पूर्वेकडून पश्चिमेकडे मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या मध्यभागी एक मुख्य प्रवेशद्वारे एका बुरुजावर दीपगृह आहे. या बुरुजाला सिद्ध बुरुज असं म्हटलं जातं. किल्ल्यावर भगवती देवीचं मंदिर आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर असलेलं भगवतीचे मंदिर हे शिवकालीन आहे. याच्या बाले किल्ल्याला नऊ बुरुज आहेत तर संपूर्ण किल्ल्याला एकूण 29 बुरुज आहेत. हा किल्ला बालेकिल्ला आणि दीपगृह तसेच किल्ला पेठ अशा तीन भागांमध्ये (Maharashtra Tourism) विभागला गेला आहे. या किल्ल्याच्या तीनही बाजूंना समुद्र तर एका बाजूला दीपगृह आहे.

गणपतीपुळे (Maharashtra Tourism)

समुद्रकिनाऱ्यावर असलेले गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. येथील हे मंदिर 400 वर्षे जुने असून येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील समुद्र प्रसिद्ध आहे. या समुद्राचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीपुळ्याला जसजसे तुम्ही जवळ याला तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज (Maharashtra Tourism) यायला सुरुवात होते. तसे पाहायला गेले तर अनेक मंदिरांमध्ये देवाच्या मूर्तीचे तोंड हे पूर्वेकडे असते मात्र या गणपतीपुळ्याच्या गणपतीचे मुख हे पश्चिम दिशेला आहे. म्हणूनच हा गणपती पश्चिम द्वार देवता म्हणून ओळखला जातो. गणपतीची प्रदक्षिणा जवळपास एक ते दीड किलोमीटर इतकी आहे आणि याची प्रदक्षिणा काढणे हे खूप भाग्याचे मानले जाते.

गुहागर

गुहागर समुद्री बीच हा रत्नागिरी पासून जवळपास आठ किलोमीटर दूर आहे. तुम्हाला जर शांतता प्रिय आणि लोकप्रिय असे समुद्र किनारे पाहायचे असतील तर तुम्ही गुहागरला आवर्जून भेट द्या. येथे तुम्ही एडवेंचर स्पोर्ट्सचा सुद्धा आनंद घेऊ शकता (Maharashtra Tourism) स्पीड बोट बंपर राईट आणि असे वेगवेगळे एडवेंचर्स गेम तिथे तुम्ही खेळू शकता.

थिबा पॉईंट (Maharashtra Tourism)

असं म्हटलं जातं की थिबा पॉईंट मधून शहराचा सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. तुम्हाला रत्नागिरीचे खरे निसर्गसुंदर्य अनुभवायचे असेल तर तुम्ही या पॉईंटला भेट देऊ शकता. याच्याशिवाय लाईट हाऊस आणि दूधपेश्वर मंदिर सुद्धा फिरण्यासाठी उत्तम ठिकाण (Maharashtra Tourism) आहेत.