राज्यात सोमवार पासून अनलॉक!! राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख गेल्या काही दिवसांपासून कमी आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार कडून पुन्हा एकदा अनलॉक करण्यात आले आहे. त्यानुसार नवी नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून ती सोमवार, ७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती समोर आली आहे.

या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.

पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड व्यापले आहेत असे जिल्हे निर्बंधमुक्त राहणार आहेत. तर ५ टक्के पॉझिटिव्हिटी दर व २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, दर गुरुवारी निश्चित निकषानुसार स्थिती आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात येणार असून त्याआधारावर कुठे निर्बंध कमी करायचे आणि कुठे वाढवायचे याबाबतचा नवा आदेश लागू केला जाणार आहे.

पाच लेव्हल/ पाच टप्पे नेमके कसे आहेत?

पहिली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील तर

पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment