कर्जत-जामखेड : रोहित पवार फिक्स आमदार ; रामाला वनवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. सत्तेची खुर्ची कोणाचीच कधी कायम नसते असे म्हणतात याचाच प्रत्येय लोकसभा निवडणुकीने दिला आहे. कारण या निवडणुकीत बऱ्याच बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पार्थ पवार यांच्या रूपाने पवार घराण्याला पहिला पराभव देखील याच निवडणुकीने बघायला लावला आहे. अशातच विधानसभेची निवडणूकीचा देखील रंगझोक थोडाफार समोर येऊ लागला आहे.

नितेश राणेंचा फिल्मी राडा ; अधिकाऱ्याला घातली चिखलाने अंघोळ

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाराकडून राष्ट्रवादीने अर्ज मागवले होते. २ जुलै अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्या दिवशी शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांनी पक्षाकडे कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी मागितली आहे. त्यांनी या संदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहून कर्जत जामखेड मधून तिकीट मागण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. जिंकण्यास सोपा असणाऱ्या मतदारसंघात लढण्यापेक्षा काम करण्यास जिथे अधिक वाव आहे अशा मतदारसंघाची मी निवड केली आहे असे रोहित पवार यांनी म्हणले आहे.

राजू शेट्टींचा आघाडीपेक्षा वेगळा विचार ; विधानसभेचे ‘मिशन ४९’

रोहित पवार यांचे सोशल मीडिया वरील समर्थक फिक्स आमदार या मथळ्या खाली रोहित पवार यांच्या पोस्ट वायरल करत आहेत. मात्र त्यांना कर्जतचे रण एवढे सोपे नसणार आहे. कारण रोहित पवार यांच्या समोर आव्हान असणार आहे ते भाजपचे नेते आणि राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे! राम शिंदे हे त्यामानाने रोहित पवार यांच्या उमेदवारीने कच खाणारे नेते नाहीत. कारण रोहित पवार यांना शिक्षण आणि समाज कार्य या दोन्ही पातळीवर सरस ठरतील अशी पात्रता राम शिंदे यांच्या ठायी आहे. त्यामुळे रोहित पवार यांची वाट हि बिकटच असणार आहे.

अर्थसंकल्प : मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट

राम शिंदे मंत्री झाल्या नंतर त्यांनी या भागात प्रलंबित असणारी बरीच कामे मार्गी लावली. त्यात येथील रस्ते , नागरी वस्तीमध्ये बिकट असणारी पाणी समस्या या महत्वाच्या समस्यांची सोडवणूक राम शिंदे यांनी केली आहे. त्याच प्रमाणे ते या मतदारसंघातील स्थानिक चेहरा म्हणून ओळखले जातात. धनगर आणि मराठा समाजाचे बलाबल असणाऱ्या या मतदारसंघात जातीवर देखील मतदान फिरणार असल्याची चर्चा आहे. तर राम शिंदे यांनी जनतेशी घट्ट ठेवलेली नाळ रोहित पवारांच्या पायातील पायगुत्त्त होणार अशी देखील या मतदारसंघात चर्चा आहे. त्यामुळे निवडणूक जरी घासून झाली तरी राम वनवासाला नव्हे तर राज्यांवर जाणार आणि फिक्स आमदार असा भुमका उठवारेपराभवाच्या गर्तेत फसणार अशी चर्चा कर्जत जामखेडच्या गावागावात रंगू लागली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

खूशखबर! शिवनेरीच्या तिकीट दरात एवढी कपात, परिवहनमंत्री रावते यांची घोषणा

Leave a Comment