Maharashtra Weather | राज्यातील परतीचा पाऊस बऱ्यापैकी संपलेला आहे. वातावरणात सकाळी आणि सायंकाळी थंडी पडलेली दिसत आहे. हवामान विभाग नेहमीच हवामानाबद्दल माहिती देत असतात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस पावसाची ये जा राहणार आहे. परंतु पुढील काही दिवसातच राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यात किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने घट झालेली आहे. आणि कमाल तापमान जास्त असल्याचे दिसत आहे. परंतु आता संपूर्ण राज्यात थंडीची चाहूल देखील लागलेली आहे. मुंबईमध्ये रात्री हवेमध्ये गारवा निर्माण झालेला आहे. तसेच दिवसा चांगलाच उन्हाचा उकाडा दिसून येत आहे. मागील दोन दिवसाच्या तुलनेत शनिवारी किमान तापमान 30° c ने घट झालेली आहे. परंतु कमाल तापमान 12 अंशापेक्षा जास्त देखील निर्माण झालेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता सांताक्रुज प्रदेशात 21.4 असेल तापमानाची (Maharashtra Weather) वाढ झालेली आहे. तसेच किमान तापमान शुक्रवारपेक्षा 30 अंशांनी कमी होत आहे. उत्तरेकडून देखील मोठ्या प्रमाणात वारे येत असल्याने किमान तापमानात घट झालेली आहे. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. राज्यामध्ये उन्हाचा उकाडा जरी वाढत असला, तरी मुंबईकरांना आता हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे.
सोमवारी मुंबईमध्ये किमान तापमान (Maharashtra Weather) हे 21°c दरम्यान असणार आहे. तर मुंबईत पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमानात घट झालेली दिसणार आहे. सायंकाळी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दिवाळीमध्ये राज्यात हवामानात बराच फरक पडणार आहे. दिवसभर उन्हाचा उकाडा असला तरी सकाळी आणि संध्याकाळी हवामानात थंड वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता आहे.