Maharashtra Weather Updates : राज्यात अवकाळी पावसाचं संकट; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

Maharashtra Weather Updates
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Weather Updates। महाराष्ट्रात एकीकडे दिवसभर उन्हाची झळ असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकटही कायम आहे. काल राज्यातील अनेक भागाला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला होता. अनेक जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडला. आजही हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील २२ जिल्हे आणि विदर्भातील ३ जिल्ह्याना अवकाळीचा फटका बसू शकतो.

कोणकोणत्या जिल्ह्याना पावसाचा फटका- Maharashtra Weather Updates

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात 30 ते 40 किमी/तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मुंबई-ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातही वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने चंद्रपूर, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. अनेक जिल्ह्यांवर ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा एकदम खाली आला आहे. पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Maharashtra Weather Updates

दरम्यान, यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधीच सक्रिय झाला असून, २०२५ सालचा पावसाळा वेळेपेक्षा चार दिवस आधी केरळच्या किनाऱ्यावर दाखल होणार आहे. निकोबार बेटांपासून त्याला सुरुवात झाली आहे. गेल्या १७ वर्षांतील पहिल्यांदाच म्हणजेच २००८ नंतर, यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार दिवस लवकर म्हणजे २७ मे २०२५ रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या मान्सून निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आणि पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागांत पोहोचलेला आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, महाराष्ट्रात मान्सून ६ जून २०२५ रोजी हजेरी लावेल, तर मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात १० जून दरम्यान तो पोहोचण्याची शक्यता आहे