महाराष्ट्र आर आर आबांच्या कर्तृत्वाला कधीच विसरणार नाही – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । “महाराष्ट्र आबांच्या कर्तृत्वाला कधीच विसरणार नाही. आबांनी डॉक्टरांनी दिलेले सल्ले ऐकले नाहीत आणि माझ्यासारख्या मोठ्या वयाच्या माणसाला मागे ठेवून गेले. आबा सोडून गेले याचे दुःख माझ्या मनात कायम आहे” असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तासगांव बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या माजी गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांचा पुतळा अनावरण सोहळा प्रसंगी आबांबद्दल भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी शरद पवार यांनी आबांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्याबद्दल अनेक आठवणी यावेळी पवार यांनी सांगितल्या. विरोधी पक्षात असताना आबांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. आबांनी अनेक कार्यक्रम देश पातळीवर राबवले. ज्यावेळी आबांकडे गृह खाते आले तेव्हा पोलीस खात्याची प्रतिमा सुधारण्याचे काम आबांनी केले. पोलिसांच्या पगाराचा प्रश्न, निवाऱ्याचा प्रश्न आबांनी सोडवला. कॉन्स्टेबलपर्यंतच्या माणसाच्या हिताची जपणूक आबांनी केली याचा मला अभिमान वाटतो.

२६/११च्या हल्ल्यातील मुख्य दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात येणार होती. केंद्रीय गृहमंत्रालयात अनेक अधिकारी माझ्या ओळखीचे होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सांगितले की जर कसाबला फाशी दिली तर दहशतवादी उन्माद माजवतील. जो माणूस फाशी देण्याचा निर्णय घेईल त्याच्या जीवाला धोका असेल. या सर्व गोष्टीची कल्पना मी आबांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिला. मात्र कसाबला फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा धाडसी निर्णय घेण्यात आर. आर. यांचा मोठा वाटा होता.

Leave a Comment