महाराष्ट्राच्या पहिल्या महिला : महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका संकपाळ फिंगरप्रिंट परिक्षेत देशात प्रथम

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, दिल्ली मार्फत दि. 4 / 12/ 2021 ते दि. 7/ 12/ 2021 रोजी दरम्यान दिल्ली येथे घेण्यात आलेल्या All India board of examination for Fingerprint expert या परिक्षेस देशातील विविध राज्यातील एकुण 76 फिंगरप्रिंटचे अधिकारी उपस्थित होते. ही परिक्षा लेखी, प्रात्यक्षिक व मुलाखत अशा स्वरुपात घेण्यात आलेली होती. सदर परिक्षेस फिंगरप्रिंट विभाग, सातारा येथील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मारुती संकपाळ या 250 पैकी 224 मार्क्स मिळवुन देशात प्रथम आल्या आहेत.

देशात प्रथम क्रमांक पटकविणा-या त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. फिंगरप्रिंट विभागात मानाची समजली जाणारी अजिज उल हक ट्रॉफी त्यांनी 20 वर्षांनंतर महाराष्ट्राकरीता आणली. त्याबद्दल पोलीस अधीक्षक, सातारा यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सदर परिक्षेस त्यांना पोलीस अधीक्षक सातारा अजय कुमार बंसल, श्रीरंग टेकवडे पोलीस अधीक्षक गु. अ. वि. अंगुलीमुद्रा केंद्र पुणे, अपर पोलीस अधीक्षक सातारा अजित बो-हाडे, स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,  पोलीस निरीक्षक अंगुलीमुद्रा केंद्र पुणे अनिल कोळी, सहा. पोलीस निरीक्षक आर. क्यु. डब्ल्यु. एस. विजय जाधव यांनी मार्गदर्शन केले.