अजित पवारांनी सादर केला अर्थसंकल्प ; पहा नक्की काय काय घोषणा करण्यात आल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला. अजित पवार नक्की कोणत्या कोणत्या घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. अजित पवार यांनी शेती आणि आरोग्य क्षेत्रा साठी आत्तापर्यंत मोठ्या घोषणा केल्या आहेत. पाहुतात अजित पवारांनी नेमक्या काय घोषणा केल्या आहेत.

अर्थसंकल्पात नक्की काय काय घोषणा करण्यात आल्या –

आरोग्य सेवांसाठी 7500 कोटींची तरतूद

सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारणार

शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांनी हे कर्ज वेळेत भरले त्यांना शून्य़ टक्के व्याजदराने कर्ज मिळणार

पिकेल योजनेला 2100 कोटी

कृषी संशोधनासाठी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटी रुपयांची तरतूद

जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना 12 हजार 919 कोटींचा निधी

ईस्टर्न फ्री वे ला विलासराव देशमुख यांचे नाव

जलसंधारण विभागासाठी 2 हजार 60 कोटींचा निधी प्रस्तावित

एसटी महामंडळासाठी 1400 कोटी रुपयांची घोषणा

अहमदनगर,बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गाचे काम वेगाने करणार

पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार

महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची तुकडी ठेवणार

गोव्याला जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटी

शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

मुंबईसाठी महत्वाच्या असलेल्या कोस्टल रोडचं काम 2024 पूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवास राज्यव्यापी योजना

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment